मुक्तपीठ टीम
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रामाचे नाव घेतात आणि बिभीषणाप्रमाणे वागतात अशी जोरदार टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. आता या आरोपाला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण असा खोचक प्रश्न त्यांनी केला आहे.
#आम्ही_बिभीषण_मग_तुम्ही_रावण?@SaamanaOnline ’चे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते @rautsanjay61 हे @Dev_Fadnavis ना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली1/4
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) May 17, 2022
काय म्हणाले केशव उपाध्ये?
- केशव उपाध्ये म्हणाले की, सामनाचे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता.
- रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही. रावणाने जो अत्याचार केला त्याविरोधात जाऊन ते प्रभू रामाच्या सैन्यासोबतच रावणाविरोधात युद्धात उभे राहिले.
- वाईट मार्गाला लागलेल्या भावालाही त्याने सोडले नाही. तुम्ही इतकी वर्ष याच बिभीषणासोबत एकत्र होता.
मग तुम्ही कोण ‘रावण’? हो हेच सत्य आहे.
वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकलीय…
- भ्रष्टवाद्यांना हाताशी धरून तुम्ही राज्याचा कारभार रसातळाला नेला.
- खुलेआम वसुली होऊ लागली.
- बदल्यांच्या रॅकेट तयार झाले.
- पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत मजल गेली.
- राज्याच्या कारभाराचे तीन तेरा वाजले.
- तुमच्या अहंकाराची लंका जाळून हा बिभीषण महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी लढतोय.
- त्यामुळे वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.