मुक्तपीठ टीम
लोकप्रिय टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. कंपनीच्या ऑफरनुसार ग्राहकांना मोफत अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. पण हा अनलिमिटेड डेटा ग्राहकांना केवळ रात्रीच्या वेळेस वापरता येणार आहे.
Vi prepaid users can now binge on the internet all night, at no extra cost, on Vi Unlimited! @ViCustomerCare pic.twitter.com/MAIJTQbh6z
— Vi_News (@VodaIdea_NEWS) February 16, 2021
फायदा आणि अट
- अनलिमिटेड डेटाचा फायदा ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत घेता येईल.
- पण, ग्राहकांना २४९ किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज करणे अनिवार्य असणार आहे.
- याशिवाय कंपनीने अन्य कोणतीही अट या ऑफरसाठी ठेवलेली नाही.
- विशेष म्हणजे कंपनीकडून डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळेल. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत न वापरलेल्या डेटाचा वापर शनिवारी किंवा रविवारी करता येणार आहे.
- नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमच्या युजर्सनाही ऑफर्सचा फायदा मिळेल.
या प्लॉन्सवर “बिंज ऑल नाइट ऑफर” उपलब्ध
२४९ रुपये, २९९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ५५५ रुपये, ५९५ रुपये, ५९८ रुपये, ५९९ रुपये, ७९५ रुपये, ८१९ रुपये, ११९७ रुपये, २३९९ रुपये आणि २५९५ रुपयांच्या प्रिपेड प्लॅनवर ऑफर उपलब्ध.