मुक्तीठ टीम
आगामी मनपा निवडणुकीची नवीन वॉर्ड रचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या प्रभाग वॉर्ड क्रमांक १ पासून ते २३६ पर्यंतच्या रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या तसेच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
कशी असणार मुंबई मनपाची नवी वॉर्ड रचना?
- राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
- त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे.
- त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
- नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत.
- शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उप६नगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत.
- वाढीव ९ वॉर्ड पैकी वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात.
मुंबईतील वाढलेल्या ९ नव्या वॉर्डची यादी
मुंबई शहर
- एफ दक्षिण – परळमध्ये – १ वॉर्ड वाढला
- जी दक्षिण – वरळीत १ वॉर्ड वाढला
- ई वॉर्ड- भायखळा- १ वॉर्ड
पश्चिम उपनगरे
- आर उत्तर- दहिसर – १ वॉर्ड वाढला
- के ईस्ट – अंधेरी पूर्व १ वॉर्ड वाढला
- आर दक्षिण- कांदिवलीत १ वॉर्ड वाढला
पूर्व उपनगरे
- एल वॉर्ड- कुर्ला- १ वॉर्ड
- एन वॉर्ड- घाटकोपर – १ वॉर्ड वाढला
- एम ईस्ट- चेंबुर- १ वॉर्ड वाढला
मुंबई मनपा एकूण जागा २३६
आरक्षण
- खुला प्रवर्ग – २१९
- एससी -१५
- एसटी – २
महिला जागा
- एकूण – १२७
- खुला प्रवर्ग – ११८
- एससी – ८
- एसटी – १