मुक्तपीठ टीम
शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत ते शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक या सभेला हजर राहणार आहेत. मात्र आज होणाऱ्या मुंबईतल्या या सभेला शिवसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम उपस्थित राहाणार नाहीत. यामुळे जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असे बोलणारे रामदास कदम शिवसेनेच्या सभेला गैरहजर राहणार, यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.
शिवसेनेच्या सभेत रामदास कदम उपस्थित नसणार…
- शिवसेनेच्या सर्व मोठ्या सभांना शिवसेना नेत्यांची उपस्थिती असते.
- या सभांमधून शिवसेना नेतृत्वाबरोबरच इतर नेत्यांचीही भाषणे होतात.
- त्यात रामदास कदम यांचेही भाषण होते.
- शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेचे निमंत्रण रामदास कदम यांना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पाठवले होते.
- मात्र या सभेला उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या रामदास कदम यांची उपस्थिती नसणार आहे.
- रामदास कदम या सभेला उपस्थित राहाणार नसल्यानं सहाजिकच राजकारणात शंकांना उधाण आलं होतं.
- मात्र आपण का उपस्थित राहणार नाही आहोत याचे कारण स्वत: रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.
शिवसेनेच्या सभेत रामदास कदम का नसणार?
- गावातील मंदिरात सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहणार नाही.
- ‘मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही.
- गावातील मंदिराचा हा सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे’, असे त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.