Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेशी मदतीचा घोटाळा: सीबीआयच्या ४० धाडी! एनजीओ, गृह मंत्रालय अधिकारी, दलाल लक्ष्य!!

May 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
CBI

मुक्तपीठ टीम

परदेशातून निधी मिळवून भारतात काम करणाऱ्या एनजीओंवर आता सीबीआयने धाडी सुरु केल्या आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो परदेशी देणग्या मिळवताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी, एनजीओचे प्रतिनिधी आणि मध्यस्थ यांच्याविरुद्ध देशव्यापी मोहीम राबवत आहे.

सीबीआयचे ४० ठिकाणी छापे

मंगळवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोईम्बतूर, म्हैसूर आणि राजस्थानमधील काही ठिकाणांसह सुमारे ४० ठिकाणी समन्वयित कारवाई सुरू आहे.

तपासादरम्यान ही बाब समोर आली

  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान असे आढळून आले की गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी, एनजीओचे प्रतिनिधी आणि मध्यस्थांनी एफसीआरए, २०१० चे उल्लंघन करून परदेशी अनुदान मिळवण्यासाठी पैशांचा व्यवहार केला.
  • आतापर्यंत, एजन्सीने या प्रकरणात गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह सुमारे सहा जणांना अटक केली आहे, असे ते म्हणाले.
  • मोहिमेत आतापर्यंत दोन कोटी रुपयांचे हवाला व्यवहार आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
  • या प्रकरणाशी अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा संबंध आढळून आलेला नाही.

FCRA म्हणजे काय?

  • परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी सर्व एनजीओंना विदेशी योगदान (नियमन) कायदा किंवा FCRA अंतर्गत नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
  • सरकारच्या FCRA मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व नोंदणीकृत संस्थांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर ९ महिन्यांच्या आत प्रत्येक आर्थिक वर्षासाठी उत्पन्न आणि खर्च विवरण, पावती आणि देयक खाते, ताळेबंद इत्यादींचा ऑनलाइन वार्षिक अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

Tags: CBIFreign fundsNgoएनजीओपरदेशी निधीसीबीआय
Previous Post

राजद्रोह गुन्ह्यांचं वास्तव: पाच वर्षात ३२६ गुन्हे, शिक्षा फक्त सहाच गुन्ह्यात!

Next Post

बदल्यांना कंटाळून आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा, बनावट जात प्रमाणपत्र तपास भोवल्याचा आरोप

Next Post
ips

बदल्यांना कंटाळून आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा, बनावट जात प्रमाणपत्र तपास भोवल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!