Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजद्रोह गुन्ह्यांचं वास्तव: पाच वर्षात ३२६ गुन्हे, शिक्षा फक्त सहाच गुन्ह्यात!

आता राजद्रोहाच्या १२४ कलमाखाली गुन्हे नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राजद्रोह कायद्यासंबंधित महत्वाचा निर्णय दिला आहे. यापुढे देशात राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हा दाखल होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित केले आहे. तसेच या प्रकराचे गुन्हे प्रलंबित असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, राजद्रोहाच्या १२४ कलमाखालील कारवाईचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांमध्ये ३२६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी फक्त सहा प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली. त्यातही सर्वात जास्त ५४ प्रकरणे आसाममधील असून तेथे एकालाही शिक्षा झाली नसल्याचे उघड झाले आहे.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्यावर पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारला आणखी एक दिवसाची मुदत दिली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित प्रकरणे आणि भविष्यातील खटल्यांकडे सरकार कसे लक्ष घालणार, असा प्रश्न केंद्राला विचारला होता. बुधवारी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने मागितले अधिक स्पष्टीकरण मागितले होते…

  • राजद्रोह कायद्याच्या फेरविचारापर्यंत प्रलंबित प्रकरणांचे काय करणार, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले होते.
  • राजद्रोह कायद्याचा फेरविचार करण्याच्या केंद्राच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी या कायद्याबाबत अधिक स्पष्टीकरण मागितले होते.
  • या कायद्याखाली दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचे काय करणार आणि कायद्याचा फेरविचार होईपर्यंत या कायद्याखाली नवे गुन्हे दाखल करणार नाहीत का असे प्रश्न न्यायालयाने विचारले होते.
  • त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचे मत विचारात घेऊन याबाबत बुधवारी भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट करत बुधवारी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडून कलमासंदर्भात फेरविचार करण्यासाठी कालावधी देण्यात यावा अशी मागणी केली.
    न्यायालयाने ही मागणी मंजूर केली आहे.
  • मात्र त्याचवेळेस केंद्र तसेच राज्य सरकारने या कलमाअंतर्गत फेरविचार प्रतिक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल करु नये असे आदेश दिलेत.

२०१४ ते २०१९ या कालावधीत राजद्रोहाचे ३२६ गुन्हे दाखल

  • २०१४ ते २०१९ या काळात देशात या वादग्रस्त कायद्यांतर्गत एकूण ३२६ खटले दाखल झाले.
  • त्यापैकी केवळ सहा जणांना शिक्षा झाली.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण ३२६ प्रकरणांपैकी ५४ प्रकरणे आसाममध्ये नोंदवण्यात आली आहेत.
  • मात्र, २०१४ ते २०१९ या काळात एकाही प्रकरणात दोष सिद्ध झालेले नाही.

Tags: central govtIndiaSedition LawSupreme Courtकेंद्र सरकारभारतराजद्रोहसर्वोच्च न्यायालय
Previous Post

आघाडीची बिघाडी: काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी भाजपासोबत! काँग्रेसने भाजपा फोडली!

Next Post

परदेशी मदतीचा घोटाळा: सीबीआयच्या ४० धाडी! एनजीओ, गृह मंत्रालय अधिकारी, दलाल लक्ष्य!!

Next Post
CBI

परदेशी मदतीचा घोटाळा: सीबीआयच्या ४० धाडी! एनजीओ, गृह मंत्रालय अधिकारी, दलाल लक्ष्य!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!