मुक्तपीठ
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (सीएमएटी) २०२१ च्या परीक्षेला स्थगिती दिली आहे. यासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) परीक्षा पॅटर्न बदलल्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
एनटीएच्या द्वारे २२ ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सीईएमएटी २०२१ निर्णय घेतला जाणार होता. परंतु एनटीएने सांगितले आहे की, ही परीक्षा मार्च २०२१च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. जर या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज केला नसेल तर, तुम्हाला २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
सीईएमएटी २०२१ परीक्षा पॅर्टनमध्ये काय झाले बदल
एआयसीटीईने या प्रवेश परीक्षेमध्ये नवीन सेक्शन जोडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा सेक्शन अशा उमेदवारांसाठी असेल ज्यांना नाविन्य आणि उद्योजकता आवड आहे. मात्र, प्रश्नपत्रिकेत अतिरिक्त / पर्यायी सेक्शन म्हणून जोडले जाईल. म्हणजेच, प्रत्येकासाठी हे अनिवार्य असणार नाही. या सेक्शन मध्ये एकूण २५ प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
ज्या विद्यार्थांनी पहिले अर्ज केला होता त्यांच्या अर्जा मध्ये काही चूका झाल्या असतील तर, त्यांना सुध्दा २५ फेब्रुवारी २०२१ नंतर ते सुध्दा अर्जात बदल करण्याची संधी दिली गेली आहे.
सीएमएटी परीक्षा म्हणजे नक्की काय?
कॉमन मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा, ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा आहे, जी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून एआयसीटीई संलग्न संस्थांमध्ये मॅनेजमेंट कोर्स मध्ये प्रवेश घेता येतो.