Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

May 6, 2022
in सरकारी बातम्या
0
Aditya Thackeray Suggestions at 'Mumbai in Transit' workshop

मुक्तपीठ टीम

नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील टाकल्या जाणाऱ्या राखेची पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही राख टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ही राख टाकणे बंद झाले असून यापूर्वी टाकलेली राख पावसाळ्यापूर्वी उचलण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे कॉप-26 या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेनंतर महाराष्ट्राच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर नेट झिरो कडे वाटचाल करताना सर्वच औष्णिक केंद्रांनीही प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.            

नांदगाव येथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व संबंधितांची ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाजनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, मंडळाचे नागपूर विभागीय अधिकारी अशोक कारे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, अभय हरणे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. घुगे आदी उपस्थित होते.            

आदित्य ठाकरे म्हणाले, नांदगाव येथे औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकली जात असल्याने या परिसरातील अनेक कुटुंबांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागत होते. ही राख टाकणे बंद करण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांमध्ये समाधान असून येथे असलेल्या राखेमुळे त्यांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी येत्या पावसाळ्यापूर्वी ती उचलण्यात यावी. सध्या राख असलेल्या जागेवर भविष्यात झाडे लावणे, सोलार ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे आदी पर्यायांचा विचार करण्याची तसेच नांदगाव परिसरातील स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. या परिसरातील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी लवकरच ऊर्जा मंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊ, असेही ते म्हणाले.            

प्रधान सचिव म्हैसकर म्हणाल्या, राज्यातील विजेची गरज पाहता औष्णिक विद्युत केंद्रांची आवश्यकता अपरिहार्य आहे. तथापि केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन कमीत कमी प्रदूषण होईल यासाठी व्यवस्थापनांनी कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.            

श्री.खंदारे यांनी यापुढे औष्णिक विद्युत प्रकल्पावरून थेट राख नेण्यासाठी एजन्सी नेमण्यात येत असल्याची माहिती देऊन यापुढे राख खुल्या जागेत सोडण्यात येणार नसल्याचे सांगितले.            

प्रारंभी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांनी नांदगाव-खापरखेडा परिसरातील सद्यस्थिती आणि मंडळाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


Tags: aditya thackerayCOP-26NandgaonThermal Power Plantऔष्णिक विद्युत केंद्रकॉप-26नांदगावपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
Previous Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: १२ आठवडे झाले तरी चॅनल्सचे मार्केट शेअर्समधील स्थान पूर्वीसारखं बदलत का नाही? समजून घ्या…

Next Post

#मुक्तपीठ #LiVE मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंचे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंचे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

#मुक्तपीठ #LiVE मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंचे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!