मुक्तपीठ टीम
भिवंडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या इतर व्यवसायांसाठी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. भोईर हे भिवंडीतील दुधाचे व्यापारीही आहेत. त्यांना आपल्या जमीन खरेदी व्यवसायासाठी देशाच्या विविध भागात प्रवास करावा लागतो. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हे हेलिकॉप्टर ३० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हेलिकॉप्टर त्यांच्या गावात चाचणीसाठी आणण्यात आले. भोईर यांनी गावातल्या ग्रामपंचायतीतील विजयी सदस्यांना त्यांनी त्यात फिरवले. जनार्दन भोईर यांची संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे असे म्हणतात.
दुध आणि शेतीबरोबरच भोईर यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायात देखील आहे. आपल्या कामाच्या संबंधात, त्यांना पश्चिमेकडून पूर्वेकडील राज्यात अनेक वेळा प्रवास करावा लागतो. बर्याच ठिकाणी उड्डाणे नसल्यामुळे त्यांचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे त्यांनी मित्राच्या सल्ल्याने हेलिकॉप्टर खरेदी केले.
दुग्ध व्यवसायासाठी त्यांना अनेकदा पंजाब, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये जावे लागते. जनार्दन भोईर यांनी घराजवळ हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड बांधले आहे. त्याचबरोबर पायलट रूम, टेक्निशियन रूम बनवण्याचीही तयारी सुरू आहे. हे हेलिकॉप्टर १ मार्च रोजी त्यांच्या ताब्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ: