मुक्तपीठ टीम
भारतातील सर्व एफएमसीजी कंपन्यांना मागे टाकत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) नवी उंची गाठली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रथमच १.१५ लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, ही उलाढाल देशातील कोणत्याही एफएमसीजी कंपन्यांच्या उलाढालींपेक्षा लक्षणीय आहे. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही देशातील एकमेव अशी कंपनी आहे जिने १ लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची एकूण उलाढाल १,१५,४१५.२२ कोटी रुपये होती , आधीच्या वर्षी ही उलाढाल २०२०-२१ ९५, ७४१.७४ कोटी रुपये होती. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने उलाढालीत २०२०-२१ या वर्षापासून २०.५४% ची वाढ नोंदवली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत, २०२१-२२ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील एकूण उत्पादनात १७२% ची प्रचंड वाढ झाली आहे तर या कालावधीत एकूण विक्री २४८% पेक्षा जास्त वाढली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे, २०२२ मध्ये एप्रिल ते जून या पहिल्या 3 महिन्यांत देशात अंशतः टाळेबंदी असतानाही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची ही मोठी उलाढाल आहे.
खादी आणि ग्रामोद्योगाचे आयोगाचे अध्यक्ष, विनय कुमार सक्सेना यांनी ,खादीच्या उलाढालीत अभूतपूर्व वाढीचे श्रेय हे देशात खादीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत दिलेल्या पाठिंब्याला दिले.त्याचवेळी, नाविन्यपूर्ण योजना, सर्जनशील विपणन नवकल्पना आणि विविध मंत्रालयांचे सक्रिय पाठबळ यामुळे अलीकडच्या वर्षांत खादीच्या प्रगतीत भर पडली आहे. आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी “स्वदेशी” आणि विशेषत: “खादी” चा प्रचार करून पंतप्रधानांनी वारंवार केलेल्या आवाहनामुळे ही आश्चर्यकारक वाढ नोंदवण्यात आली आहे., आज खादी देशातील सर्व एफएमसीजी कंपन्यांपेक्षा आघाडीवर आहे, असे त्यांनी सांगितले.