Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वंचितचा महाराष्ट्र दिनी शांतता मार्च, समाजात दंगली होऊ न देण्याचा निर्धार – रेखा ठाकूर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rekha Thakur VBA 30-4-22

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांतता भंग होऊ नये या करीता १ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च काढण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडविण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक तेढ वाढवणारी भाषणे केली आहेत आणि म्हणून त्यांना औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती परंतू महाराष्ट्र सरकारचे वागणे अनाकलनीय आहे त्यांनी या सभेला परवानगी दिली आहे. याचा अर्थ दंगे भडकविण्यासाठी महाविकास आघाडी पोषक आहे अशी परिस्थिती आहे. दंगली घडू नये म्हणून पायबंद घालण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे. स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रात दंगली भडकणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शांतीचा संदेश देणारा शांतता मार्च १ मे रोजी काढण्यात येणार आहे. समाजात धार्मिक सद्भावना आणि सलोखा, शांती बिघडू न देणे, समाजात जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील हीच भूमिका प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मांडली होती. याच धर्तीवर १ मे रोजी शांतता मार्चची जोरदार तयारी करण्यात येत असून त्याकरिता साडेसातशे युनिट कामाला लागले आहेत. हा शांतता मार्च यशस्वी करण्यासाठी वंचितचे सर्व स्तरावरील नेते, पदाधिकारी कायकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असल्याचे देखील रेखा ठाकूर यांनी दिली.

पाहा व्हिडीओ:

https://youtu.be/2WDOIrwNoc0

Tags: Maharashtra Daypeace marchrekha thakurvanchit bahujan aghadiVBAमहाराष्ट्र दिनरेखा ठाकूरवंचितवंचित बहुजन आघाडीशांतता मार्च
Previous Post

राज्यात १५५ नवे रुग्ण, १३५ बरे! मुंबई ९४, पुणे २५, ठाणे १७

Next Post

खादीची कॉर्पोरेटपेक्षा सरस कामगिरी! एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार!!

Next Post
kvic

खादीची कॉर्पोरेटपेक्षा सरस कामगिरी! एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!