मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवार झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकारण सुरू झालं आहे. सोमय्यांच्या गाडीवर ज्याप्रकारे दगडफेक व त्यानंतर त्यांना झालेली जखम ही खोटी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चं मन शांत करायला आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी, असा उपायही राऊतांनी त्यांना दिला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
- मुंबई ते पत्रकारांशी बोलत असताना, किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे मुंबईतील घटनेची तक्रार केल्याचं पत्रकारांनी राऊतांना सांगितले.
- त्यावर, संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
- त्यांनी सोमय्या यांना माथेफिरू म्हणत, एखादा वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठांच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याकडं लक्ष देण्याची गरज नाही.
फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी…
- ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत.
- पुढची २५ वर्षे त्यांची सत्ता येऊही शकणार नाही.
- त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
- त्यांचे मन अशांत झाले आहे.
- अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी.
- जेणेकरून फडणवीसांचं मन शांत होईल.
फडणवीस नेमक्या कोणत्या हिटलरशाहीबद्दल बोलत आहेत?
- या देशात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे?
- केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांवर कसा दबाव आणला जातो, न्यायालयांवरही कशा प्रकारे दबाव आणला जातो, अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्ष कसा दहशतीत आहे, तसेच देशातील मानवी हक्कांबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
- त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या हिटलरशाहीबद्दल बोलत आहेत, हे समजून घ्यावे लागेल.
- देवेंद्र फडणवीस यांनी देशातील स्थितीवरच चिंता व्यक्त केली असण्याची शक्यता आहे.