मुक्तपीठ टीम
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (ACIO) या पदांवर एकूण १५० जागांवर नोकरीची संधी आहे. संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासाठी ५६ पदे तर ९४ पदे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनसाठी आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
- ग्रेड-2/टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्ससह भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा संगणक किंवा संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
- उमेदवारांनी २०२०, २०२१ किंवा २०२२ ची GATE परीक्षा पदांशी संबंधित विषयात उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
उमेदवाराचे १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
ही भरती ऑनलाइन पद्धतीने होत असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in वरून अर्ज करा आणि माहिती मिळवा.
पाहा व्हिडीओ: