मुक्तपीठ टीम
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडरच्या एकूण ०८ पदांसाठी भरती आहे. ही भरती नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) पदासाठी PGDM. तसेच तीन वर्षांचा कामाचा अनुभव गरजेचा.
उमेदवाराकडे सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थशास्त्र/अर्थमिती/सांख्यिकी आणि माहितीशास्त्र/उपयोजित सांख्यिकी आणि माहिती शास्त्र या विषयात ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह वित्त ६०% विशेष गुण असावेत. - सल्लागार (फसवणूक जोखीम) या पदावरील भरतीसाठी, उमेदवार सेवानिवृत्त IPS, राज्य पोलीस/CBI/Intelligence Bureau/CEIB अधिकारी म्हणून पाच वर्षांचा अनुभव असावा.
- व्यवस्थापक (परफॉर्मन्स प्लॅनिंग आणि रिव्ह्यू) या पदासाठी उमेदवाराकडे ०४ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे. B.Com./B.E./B.Tech आणि PG व्यवस्थापन/MBA पदवी केलेली असावी.
शुल्क
- जनरल / ईडब्लूएस आणि ओबीसी साठी: ७५०/
- एससी/एसटी/पाडब्लूडी साठी: कोणतेही शुल्क नाही
अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.