मुक्तपीठ टीम
जेम्स लेनच्या पुस्तकात माहितीसाठी बाबासाहेब पुरंदरेंना श्रेय देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यासाठी पुरंदरेंवर होणारी टीका योग्यच असल्याचं शरद पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर देताना म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पु्स्तकावर बंदीसाठी महाराष्ट्रातील काही मान्यवरांसह इतिहासकारांनी जे पत्र लिहिलं त्यावर बाबासाहेबांचीही सही होती. ते पत्र पवारांना कसं माहित नाही, असा प्रश्न विचारला आहे.
ते पत्र इतिहासकारांनी लिहिले आहे. त्यात पहिली सही तत्कालीन खासदार प्रदीप रावत, दुसरी बाबासाहेब पुरंदरे आणि जी. बी. मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, जयसिंगराव पवार यांसारख्या इतिहासतज्ञांनी सह्या केल्या आहेत.
संदीप देशपांडेंचे राष्ट्रवादीला प्रश्न…
- संदीप देशपांडेंनी हे पत्र समोर आणत राष्ट्रवादीला काही प्रश्न विचारले आहेत.
- संदीप देशपांडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना हे पत्र माहिती नाही का?
- २००३ ला राज्यात सत्ता कुणाची होती?
- पवारांना माहिती असताना पुरंदरेंचा अपप्रचार का?
- तसेच पुढे बोलताना राज्यात १९९ पासून जाती जातीत भांडणं झाली ते यासाठीच बोललं जातं.
पत्रात नेमकं काय आहे?
- ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेल्या पत्रात जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली आक्षेपार्ह माहिती ही त्याची स्वतःची कुटील कल्पना आहे.
- हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशनाने मागे घेण्यात यावे.
- अन्यथा या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- विशेष म्हणजे या पत्रावर अशी मागणी करून सही करणारे तत्कालीन खासदार प्रदीप रावत वगळता सारे मान्यवर हे इतिहास तज्ज्ञ आहेत.
- एकंदर शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यावेळेसच आपली भूमिका विरोधी असल्याचे स्पष्ट केली होती, असा दावा मनसेने केला आहे.