Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची पाहणी: “नाल्यांना जलपर्णीचा वेढा, गाळांचे ढिगारे!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar visit mumbai nalas & raise objections

मुक्तपीठ टीम

पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी आज भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तेव्हा नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना ? असा सवाल करीत हे कधी साफ होणार ? याबाबत चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही दौरे करायला लागताच पन्नास लाखाच्या घड्याळात ज्यांचे टायमिंग चुकले ते आता जागे झाले, अशी टीका ही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.

 

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाने नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला असून आजच्या तिस-या दिवशी मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर या भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. डहाणुकर वाडीतील नाला असो वा पोयसर नदी यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून अद्याप अनेक ठिकाणी कामाला सुरूवात झालेली नाही. तर काही नाल्यामध्ये आता एक एक जेसीपी, पोकलेन मशिन उतरवून काम करण्यात येते आहे. त्यामुळे कामांची गती वाढवणे आवश्यक असून या वेगाने गेल्यास कधी कामे पुर्ण होणार ? असा सवाल भाजपा नेते आमादार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

 

यावेळी त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, यांच्यासह स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

दरम्यान, याबाबबत बोलताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, कामांना अद्याप कुठेही वेग आलेला नाही. कामांना गती देण्याची गरज आहे. मुळातच कामांना मंजूरी देण्यास विलंब झाला. भाजपाने रेटा वाढविला त्यानंतर प्रशासन जागे झाले. आम्ही नाल्यावर भेटी देऊ लागताच प्रशासन आणि कंत्राटदारांची पळापळ सुरू झाली आहे. पण ज्यांची ही जबाबदारी होती ते कारभारी मुदत संपली असं सांगून फरार झाले होते. भाजपाने दौरे सुरू करताच पालकमंत्र्यांनी आता दौरा करण्याचे जाहीर केल्याचे वाचनात आले. ज्यांचे पन्नास लाखांच्या घड्याळात टायमिंग चुकले होते त्यांना भाजपामुळे जाग आली आहे. मुंबईकरांची आता आठवण झाली अशी टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.

यांना रेल्वे उड्डाण पुलावर बोलण्याचा अधिकार आहे का.?

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोअर परेल येथील उड्डाणपुलाला होत असलेल्या विलंबा बाबत रेल्वेवर टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, हा रेल्वे उड्डाणपुल लवकर व्हावा ही आमचीही मागणी आहे. पण आज जे अचानक जागे झाले त्यांना उड्डाण पुलाबाबत बोलण्याचा अधिकार आहे का? ज्यावेळी प्रभादेवी आणि परेल येथील पादचारी पुल कोसळला, मुंबईकंराचे मृत्यू झाले त्यावेळी आम्ही केंद्र सरकारला विनंती करुन निकड लक्षात आणून देत सैन्य दलाला मुंबईत पाठविण्याची विनंती केली. सैन्य दल आले त्यांनी विक्रमी वेळेत पादचारी पुल पुर्ण केले. पण जेव्हा मुंबईकरांसाठी सैन्यदल रेल्वे पटरीवर उतवरले गेले तेव्हा, आज जे बोलत आहेत त्यांचा पक्ष त्यावर त्यावेळी टीका करीत होता. त्यामुळे आज तुम्ही बोलण्याचा नैतिक अधिकार गामवून बसला आहात, अशी खरमरीत टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.


Tags: adv. ashish shelarBJPdahisarmaladmumbaiदहिसरनालेसफाईभाजपामालाडमुंबईॲड.आशिष शेलार
Previous Post

राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘समाधानी’ वसंत मोरेंचा सुविचार “संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही!”

Next Post

न्यायालयात आजचा दिवस आघाडीचा! सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला! सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवली!!

Next Post
sadavarte vs somaiya

न्यायालयात आजचा दिवस आघाडीचा! सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला! सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!