Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायालयात आजचा दिवस आघाडीचा! सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला! सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवली!!

सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा पोलिसांचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sadavarte vs somaiya

मुक्तपीठ टीम

आजचा दिवस राज्यातील सत्ताधारी आघाडीसाठी न्यायालयातून चांगल्या बातम्यांचा आहे. विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठी जमवलेला निधी घोटाळाप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांचा  अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस ठरवलं तर कधीही अटक करु शकतात. त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी निकाल अपेक्षित आहे. दुसरीकडे अॅड. गुणवंत सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. १३ एप्रिलपर्यंत सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ते आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आहेत. धक्कादायक बाब अशी की, सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा आरोप पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्याचे वाटे कोणाला गेले त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

 

किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा!

  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
  • त्यांनी विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवल्याचा आरोप केला आहे.
  • माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
  • त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला आहे.
  • त्यात आज न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी आहे.

संजय राऊत यांनी केलं होतं ट्वीट…”सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल”

  • आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल.
  • किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे.
  • लोकांनी आता गप्प बसू नये.
  • जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंची कोठडी वाढली!

  • एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला.
  • राज्यातील इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली.
  • पोलिसांनी या प्रकरणी १०९ कर्मचारी आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली.
  • न्यायालयाने पहिल्याच तारखेला कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
  • दोन दिवसात पोलीस तपासात आणखी काही महत्वाची माहिती आणि काहींची नावे समोर आली.
  • पोलिसांनी ती माहिती न्यायालयात सादर केल्यानंतर आज गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली.

 

सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा आरोप

  • धक्कादायक बाब अशी की, आजवर कर्मचाऱ्यांकडून पैसे न घेतल्याचे सांगणाऱ्या सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक कोटीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचं पोलिसांनी मांडलं.
  • त्याचे वाटे कोणाला गेले त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
  • तसंच नागपूरहून आलेला एक फोन कुणाचा त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
  • सातारा पोलिसांनी समाजात विद्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यात सदावर्तेंची कोठडी मागत आहेत.

Tags: adv. gunratna sadavarteINS VikrantKirit Somaiyasanjay rautST Workerआयएनएस विक्रांतएसटी कर्मचारीकिरीट सोमय्यागुणरत्न सदावर्तेभाजपाशरद पवारसंजय राऊतसिल्व्हर ओक
Previous Post

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची पाहणी: “नाल्यांना जलपर्णीचा वेढा, गाळांचे ढिगारे!”

Next Post

राज्यात ४१ नवे रुग्ण, ८७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ४१ नवे रुग्ण, ८७ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!