Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘समाधानी’ वसंत मोरेंचा सुविचार “संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vasant More , Raj Thackeray And Babar

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मनसे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. वसंत मोरेच्या हकालपट्टीनंतर त्यांना इतर पक्षांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मात्र, वसंत मोरे यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बोलवल्यानंतर त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थ’ येथे वसंत मोरेंनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करत “मी माझ्या साहेबांसोबत” असल्याचे सांगितले. त्याच ट्वीटमधील “आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!” हे वाक्य राजकीय वर्तुळात लक्ष वेधणार ठरले आहे.

 

भेटीनंतर वसंत मोरेंचं ट्वीट!

  • राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी यांनी ट्वीट केले आहे.
  • “मी माझ्या साहेबांसोबत…आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
  • त्यामुळे सध्या तरी वसंत मोरे दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार नसल्याचे दिसते आहे.
  • त्यांच्या ट्वीटमध्ये पुण्याचे मनसेचे नवीन शहराध्यक्ष आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासोबतचे छायाचित्रही आहे.

 

मी माझ्या साहेबांसोबत…

आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!

🚩🙏 जय श्रीराम 🚩🙏 pic.twitter.com/4eAfvgf5wx

— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 11, 2022

 

राज यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंच्या शंका दूर!

  • मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेतली.
  • भेटीनंतर आपण १०० टक्के समाधानी असल्याचे वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितले.
  • वसंत मोरे यांनी या भेटीनंतर सांगितले की, आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत.
  • आपण पक्षातच राहणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

 

नेमकं प्रकरण काय?

  • राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
  • राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपली अडचण झाली असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं होतं.
  • यानंतर मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.
  • महत्त्वाचं म्हणजे नाराज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती.
  • मात्र त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.
  • अखेर रविवारी राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर सोमवारी ही भेट झाली.

Tags: mnspuneRaj Thackerayvasant moreपुणेमनसेराज ठाकरेवसंत मोरे
Previous Post

भिमजयंती उत्सवाला परवानगीसाठी अकोला मनपात वंचितची एक खिडकी!

Next Post

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची पाहणी: “नाल्यांना जलपर्णीचा वेढा, गाळांचे ढिगारे!”

Next Post
ashish shelar visit mumbai nalas & raise objections

भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांची पाहणी: "नाल्यांना जलपर्णीचा वेढा, गाळांचे ढिगारे!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!