मुक्तपीठ टीम
पती आणि पत्नीचं नातं हे जीवाभावाचं असतं. सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या सावित्रींच्या कथा खूपच ऐकायला मिळतात पण उत्तरप्रदेशातील एका पतीने आपल्या पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी कमालीचे कष्ट घेतले. इतर काही साधन नसल्याने तो पती आपल्या आजारी पत्नीला हातगाडीवर घेऊन चार किमी दूर चालत गेला. त्याच्या पत्नीप्रेमातून केलेल्या कष्टाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला. बलियाच्या चिलकहार ब्लॉकमधील रहिवासी शुकुल राजभर यांचा हा व्हिडीओ २८ मार्चचा आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
- शुकुल राजभर यांची पत्नी जोगिनी देवी (५५) यांची प्रकृती ठीक नव्हती.
- २८ मार्च रोजी प्रकृती चिंताजनक झाल्यावर शुक्ला यांनी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी आजूबाजूला वाहन शोधले, परंतु ते सापडले नाही.
- यानंतर ते पत्नीसह हातगाडीवर चिलकहार येथे गेले.
- डॉक्टरांनी जोगिनीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
- तेथून शुक्ला यांनी पत्नीला खासगी मार्गाने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
- या घटनेचा फोटो ट्विटरवर अपलोड झाल्यानंतर शुकुल चिलाखरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला असता तर तेथे रुग्णवाहिका का उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रुग्णवाहिकेसाठी फोन आला नसल्याचा दावा!
- चिलकहार पीएचसीचे प्रभारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी टीम पाठवली होती.
- यानंतर सदर व्यक्तीने पत्नीला हातगाडीतून चिल्कहार येथे आणल्याचे निष्पन्न झाले.
- यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
- आणि रुग्णवाहिकेसाठी कोणताही फोन न आल्याचा दावा त्यांनी केला आहे.