Tuesday, May 20, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नवनिर्वाचित आमदारांसाठी शिकवणी वर्ग! नावं नोंदवून ११० आमदार झाले विद्यार्थी!

April 5, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधिमंडळाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी शिकवणी वर्ग भरणार आहेत. येत्या ५ आणि ६ एप्रिल रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याविषयी माहिती दिली. या शिकवणी वर्गासाठी आतापर्यंत ११० आमदारांनी नावं नोंदवली आहेत. लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात डॉ. गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत अलीकडेच संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक ५ व ६ एप्रिल, २०२२ रोजी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन संसद भवन, लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

या दोन दिवसीय संसदीय अभ्यासवर्गात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्यासह ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ सन्माननीय सदस्यांना प्राप्त होईल.

 

दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वा. संसद ग्रंथालय इमारतीतील (पीएलबी) मुख्य सभागृहात या अभ्यासवर्गाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्या मार्गदर्शनाने होईल. याप्रसंगी सन्माननीय सदस्यांसह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच लोकसभा सचिवालयाचे महासचिव उत्पल कुमार सिंग, अतिरिक्त सचिव प्रसेनजित सिंग, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने उपस्थित राहणार आहेत.

 

कायदेमंडळातील विधिविषयक आणि वित्तीय कामकाज, सभागृहाचे विशेषाधिकार, प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्त्व आणि सदस्यांचा सहभाग, समिती पध्दती – संसदीय कार्यप्रणालीचा आत्मा, सुशासन आणि विधानमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान इत्यादी विषयांवर ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री विधिमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाच्या अवलोकनाची संधी, संसदेतील मध्यवर्ती ग्रंथालय येथे अभ्यासभेट देखील प्रस्तावित आहे.

 

पानिपत स्मारकाच्या व्यवस्थेबाबत स्थानिक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर अनुयायांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेतही समर्थपणे परकीय सत्तांचा सामना करत देश रक्षणाचे कार्य केले. देश रक्षणासाठी पानिपत येथे धारातीर्थी पडलेल्या या शूरांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या पानिपत स्मारकाला भेट देवून या स्मारकाची व्यवस्था अधिक चांगली होण्यासाठी स्थानिक मराठी संघटना, जिल्हाधिकारी व महानगर पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या .

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsLegislative Council Deputy Speaker Dr. Neelam GorheLok Sabha SecretariatMaharashtra LegislatureMLA studentsmuktpeethNewly elected MLAsParliament HouseParliamentary Training Action Programteaching classesआमदार विद्यार्थीचांगली बातमीनवनिर्वाचित आमदारमहाराष्ट्र विधिमंडळमुक्तपीठलोकसभा सचिवालयविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशिकवणी वर्गसंसद भवनसंसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रम
Previous Post

भारताच्या निर्यातीनं ओलांडलं लक्ष्य, वर्षभरात ४१८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात!

Next Post

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंटच्या २६६ जागांवर भरती

Next Post
barc

भाभा अणु संशोधन केंद्रात स्टायपेंडरी ट्रेनी, सायंटिफिक असिस्टंटच्या २६६ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!