Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताच्या निर्यातीनं ओलांडलं लक्ष्य, वर्षभरात ४१८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Exports

मुक्तपीठ टीम

चालू आर्थिक वर्षात भारतातील व्यापारी मालाची निर्यात ४१८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्यावर पोहोचली आहे. हा आकडा नॉन-ईडीआय पोर्टस आकडे वगळून आहे. ते आकडेही धरले तर निर्यात ४१८ अब्ज डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे, जो भारताच्या निर्यात इतिहासातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. या कामगिरीविषयी भाष्य करताना वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत खरोखरच ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे.

 

भारताने मार्च २०२२ मध्‍ये ४०.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स व्‍यापारी निर्यातीचे सर्वोच्च मासिक मूल्‍य गाठले आहे, मार्च २०२१ च्‍या ३५.२६ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत त्यात १४.५३% ची वाढ झाली आहे आणि मार्च २०२० च्‍या २१.४९ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत त्यात ८७.८९% ची वाढ झाली आहे.

 

एप्रिल २०२१-मार्च २०२२ या कालावधीत बिगर-पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यात एप्रिल २०२१ ते मार्च 2022मध्ये 32.62% ची वाढ झाली आणि ती ३५२.७६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती,जी एप्रिल २०२०-मार्च २०२१ मध्ये २६६.०० अब्ज अमेरिकन डॉलर्स (USD)इतकी होती. तर एप्रिल २०१९ ते मार्च २० मधे ती २७२.०७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती आणि त्या तुलनेत २९.६६ % ची वाढ झाली होती.

 

वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत खरोखरच ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे.

 

या प्रगतीचा लाभ प्रत्येक भारतीयाला मिळावा हे,सुनिश्चित करत असताना भारत ज्या वेगाने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करत आहे ;त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असे श्री गोयल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत हे नेत्रदीपक लक्ष्य साध्य करू शकला आहे.

 

भारताची अर्थव्यवस्था अनेक विक्रम पार करण्याच्या तयारीत असल्याचा विश्वास व्यक्त करून श्री गोयल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतासमोर उदात्त उद्दिष्टे ठेवली आहेत आणि आपले राष्ट्र अशी विशाल उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. अशक्य ते शक्य करण्यासाठी अथक प्रयत्न करा आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

गोयल म्हणाले की, आमच्या निर्यातदारांची ‘कधीही हार मानू नका’ (‘नेव्हर से डाय’)ही भावना, आपले निर्यातदार,ईपीसी आणि इंडस्ट्री असोसिएशन यांचे अथक प्रयत्न, भारत सरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांमधील समन्वय यात ‘संपूर्ण शासन हा दृष्टीकोन’ प्रतिबिंबित होत आहे.

 

अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक एमएसएमई यांनी आणि राज्य सरकारांनी मिळून हे लाभदायी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. २०२१-२२ मधील भारताचा वैविध्यपूर्ण निर्यात पोर्टफोलिओ भारताच्या उत्पादन क्षमता तसेच उच्च प्रतीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उत्पादनांमध्ये वाढ दर्शवतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Exports in US dollarsgood newsIndiamerchandise exportsmuktpeethअमेरिकन डॉलर्सची निर्यातचांगली बातमीभारतमुक्तपीठव्यापारी माल निर्यात
Previous Post

वर्दीतील भूतदया! तहानलेल्या माकडाला पाणी पाजणाऱ्या पोलीस शिपायाचा व्हिडीओ व्हायरल!!

Next Post

नवनिर्वाचित आमदारांसाठी शिकवणी वर्ग! नावं नोंदवून ११० आमदार झाले विद्यार्थी!

Next Post
vidhan bhavan

नवनिर्वाचित आमदारांसाठी शिकवणी वर्ग! नावं नोंदवून ११० आमदार झाले विद्यार्थी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!