मुक्तपीठ टीम
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत सन २०२१-२२ वर्षासाठी पलुस तालुक्यातील ६ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यातील ४ कोटी ५० लाख इतका निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील आनंदमूर्ती मठ परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी ४ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी १ कोटी २० लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुर्ली येथील बंचाप्पा मंदिर परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी ३ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ९० लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद महाराज मठ परिसरात रस्ता, भक्त निवास, सभागृह, पार्किंग सुविधा पुरविण्यासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ६० लाख इतका निधी वितरीत केला आहे. कुंडल येथील दत्त मंदिर परिसरात रस्ता व इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी १ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ३० लाख इतका निधी वितरीत केला आहे. पुणदी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, टॉयलेट, रस्ता काँक्रीटीकरण, नदी घाट बांधकाम करण्यासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ६० लाख इतका निधी वितरीत केला आहे. सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभागृह, जोडरस्ता, संरक्षण भिंत, पार्किंग, जमीन सुधारणा करण्यासाठी ३ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून ९० लाख इतका निधी वितरीत केला आहे.