मुक्तपीठ टीम
पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी या संस्थेत काही पदांवर संधी आहे. इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार या पदांसाठी संस्थेने अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती पुणे शहरात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक- किमान उच्च द्वितीय श्रेणीसह पदवीधर (कायद्याची पदवी प्राधान्य)
- ज्युनियर क्लर्क- किमान उच्च द्वितीय श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर
- रजिस्ट्रार- किमान उच्च द्वितीय श्रेणीसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक या पदासाठी ४० ते ५० वर्ष, ज्युनियर क्लर्क या पदासाठी ३० ते ३५ वर्ष, रजिस्ट्रार या पदासाठी नियमानुसार वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी इंडियन लॉ सोसायटीच्या अधिकृत वेबसाइट https://ilslaw.edu/ वरून माहिती मिळवू शकता.