Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचे नवे मेट्रो मार्ग: शनिवारी गुढी पाडव्याला उद्घाटन, रविवारपासून प्रवास!

सध्या दोन नव्या मेट्रो मार्गांच्या दहिसर – अंधेरीमधील पहिल्या टप्प्यांचेच उद्घाटन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Metro 2A, 7 Phase

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या मेट्रो २च्या दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७च्या या दोन मार्गांच्या दहिसर ते आरे टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे दोन मार्गांशी जोडलेले प्रवासी मेट्रोमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

 

आता दोन्ही मेट्रोंच्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन

  • पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे.
  • ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेचे काम सुरु आहे.
  • शनिवारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल.
  • गुढीपाडव्याला ‘मेट्रो २ अ’ मार्गाच्या दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी टप्प्याचे उद्घाटन आहे.
  • दहिसर ते अंधेरी पूर्व अशी ‘मेट्रो ७’ मार्गाच्या दहिसर ते आरे या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल.
  • रविवारपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.
  • मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील लिंक रोड, हायवेवरील वाहतूक कोंडी घटण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे रस्ते प्रवासासाठीचा वेळही घटण्याची शक्यता आहे.
  • उरलेले काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील दहिसर ते अंधेरी या टप्प्यातील वाहतूक सुरु केली जाण्याची शक्यता आहे.

 

Get ready to experience travel comfort comparable to International Cities right in Mumbai!From 2nd April onwards Metro line 2A & 7 wl be operational for public commute #MumbaiMetro2022 #HaPadwaGoodyPadwa @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @MMMOCL_Official @MumbaiMetro3 pic.twitter.com/oLnZ3lD7kr

— MMRDA (@MMRDAOfficial) March 31, 2022

रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून गारेगार मेट्रोनं प्रवास करा!

  • प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
  • मात्र शनिवारी संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे.
  • त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ सेवा सुरू करणे शक्य नाही.
  • त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी आणि दहिसर ते आरे मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल.
  • सध्या पहिल्या टप्प्यासाठी ११ गाड्या असून वर्षभरात आणखी २० गाड्यांची भर पडेल.

नव्या मेट्रोचे नवे तिकीट दर किती?

  • पहिल्या टप्प्यासाठी १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपये असे तिकीट दर असणार आहेत.
  • सध्या पासची सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरात लवकर पासची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीनिवास यांनी या वेळी सांगितले.
  • तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत देण्यात येणार आहे.
  • ही सवलत नेमकी कशी असेल आणि ती कधी लागू होईल हे लवकरच जाहीर केले जाईल.

Tags: cm uddhav thackerayGudhi PadvaMMRDAmumbaimumbai metroएमएमआरडीएगुढीपाडवामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईमुंबई मेट्रो
Previous Post

पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीत इस्टेट ऑफिसर, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार पदांवर संधी

Next Post

कृष्णातिरी कला-संस्कृती आणि खाद्योत्सवाची बहार!

Next Post
कृष्णातिरी कला-संस्कृती आणि खाद्योत्सवाची बहार!

कृष्णातिरी कला-संस्कृती आणि खाद्योत्सवाची बहार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!