मुक्तपीठ टीम
क्रिस रॉक आणि अभिनेता विल स्मिथ यांच्यातील वादामुळे ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळा चर्चेत आला. क्रिस रॉक याने या कार्यक्रमातअभिनेता विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली, त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने क्रिस रॉकला थप्पड मारली. या वादाची चर्चा जगभरात झाली आहे. या गदारोळाने क्रिस रॉकला मात्र याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. क्रिस रॉकच्या आगामी स्टँड अप शोची मागणी वाढल्याचे वृत्त आहे. त्याच्या स्टँड अप शोच्या तिकिटांची किंमतही दहापट वाढली आहे.
या गदारोळानंतर क्रिस रॉकचे नशीब चमकले आहे. आज प्रत्येकजण गुगलवर त्याच्याबद्दल माहिती गोळा करत आहे, आणि त्याच बरोबर त्याच्या कॉमेडी टूरलाही फायदा होत आहे. क्रिस रॉकला लोकप्रियता मिळाली आहे. टिकपिकने ट्विट केले की, ‘आम्ही काल रात्री क्रिस रॉकच्या शोसाठी इतकी तिकिटे विकली की जितकी आम्ही संपूर्ण महिन्यात विकली नसेल.’
तिकिटाचे दर किती वाढले?
- माहितीनुसार, १८ मार्च रोजी क्रिस रॉकने एक शो केला, ज्याची सर्वात स्वस्त तिकीट किंमत ४६ डॉलर (३५०० रुपये) होती.
- पण आता क्रिसच्या शोच्या तिकिटाची किंमत ४११ डॉलर (३१, २७४) झाली आहे.
- क्रिस रॉकच्या शोच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
३० शहरांमध्ये दौरे करणार
- क्रिस रॉक ३० मार्च आणि १ एप्रिल रोजी बोस्टनमधील विल्बर थिएटरमध्ये शो सादर करेल. त्याचे येथे सहा शो होतील.
- यानंतर २ एप्रिलपासून क्रिस रॉकची ‘इगो डेथ वर्ल्ड टूर’ सुरू होणार आहे.
- ख्रिस ३० शहरांचा दौरा करणार आहे.
- या दौऱ्यासाठी त्यांच्या ३८ तारखा आधीच ठरल्या आहेत.
- न्यूयॉर्क, लास वेगास, टोरंटो, शिकागो अशा अनेक ठिकाणी तो परफॉर्म करणार आहे.
- विशेष बाब म्हणजे क्रिस रॉकचा हा टूर १७ नोव्हेंबरला लॉस एंजेलिसच्या डॅल्बी थिएटरमध्ये संपणार आहे.