मुक्तपीठ टीम
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी आणि विक्री दोन्ही वाढत आहे. हिरो इलेक्ट्रिक ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. कंपनीकडे विविध फिचर्स आणि रेंजने सुसज्ज असलेल्या वाहनांचा पर्याय आहे. अशाच स्कूटरपैकी एक म्हणजे हिरो एडी आहे. खरं म्हणजे ही स्कूटर चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही. याशिवाय स्कूटरमध्ये तुम्हाला ८५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.
हिरो एडी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आहे तरी किती?
- या महिन्यात ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणण्यात आली आहे.
- ही एक कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्यामुळे त्याला नोंदणीची आवश्यकता नाही किंवा वाहन चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकता नाही.
- ७२ हजार रुपये एक्स-शोरूम किंमतीची, ही स्कूटर फेम सबसिडी अंतर्गत समाविष्ट नाही.
- ही स्कूटर पिवळ्या आणि निळ्या या दोन कलर ऑपशन्समध्ये येते.
ई-स्कूटरचे फिचर्स
- या स्कूटरचा टॉप स्पीड फक्त २५ किमी प्रतितास इतका मर्यादित आहे आणि मोटर खूपच लहान आहे.
- पूर्ण चार्ज केल्यावर ८५ किमी पर्यंत ही चालते असा दावा केला जात आहे.
- ही स्कूटर कमी अंतरावर जाण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
- याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
- यात रिव्हर्स मोड, फॉलो मी हेडलॅम्प, ई-लॉक, फाइंड माय बाइक असे फिचर्स आहेत.
- यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
- फोन चार्ज करण्यासाठी यात यूएसबी पोर्ट आहे.