मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमध्ये गेले २५ दिवस युद्ध सुरुच आहे. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र ही चर्चा अयशस्वी झाल्यास दोन्ही देशांमध्ये तिसरे महायुद्ध होण्याचा इशारा झेलेन्सकी यांनी दिला आहे. कीव्ह इंडिपेंडंटने झेलेन्स्कीच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. आता मुळात प्रश्न हा आहे की रशिया युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारणार का? तसेच ती यशस्वीच होणार का, की झेलेन्स्कींनी व्यक्त केलेली भीती सार्थ ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रशियन सैनिक युक्रेनच्या आतील भागांपर्यंत पोहचले आहेत…
- रशियन सैन्य आतील भागात पोहोचले आहे.
- शहरातील जोरदार गोळीबारामुळे एक मोठा स्टील प्लांट बंद करावा लागला आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी पाश्चात्य देशांना अधिक मदतीसाठी आवाहन केले.
- राजधानी कीव्हमधील एका तात्पुरत्या अनाथाश्रमात किमान २० मुले अडकली आहेत.
दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मारियुपोल बंदर शहरावरील हल्ला इतिहासात नोंद होईल कारण झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला युद्धातील गुन्हा असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ज्यांनी शांततापूर्ण शहरावर आक्रमण केले. तो एक दहशतवादी आहे. जे येणार्या काळात शतकानुशतके लक्षात राहील.
मारियुपोल या बंदर शहरावर रशियाचा भीषण हल्ला…
- युद्धाच्या २५ व्या दिवशी रशियन सैन्याने युक्रेनमधील मारियुपोल या बंदर शहरावर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला.
- आलम म्हणजे या शहरातील ८० टक्के निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
- जिटोमीर परिसरात युक्रेनच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रावरच रशियाने हल्ला केला आहे.
- ज्यामध्ये १०० हून युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
- येथील एका शाळेवर बॉम्ब टाकण्यात आले आणि रॉकेट टाकण्यात आला.
- हल्ला टाळण्यासाठी या शाळेत ४०० लोक लपून बसले होते.
- हल्ल्यानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- यापूर्वी मारियुपोलमधील एका थिएटरवर बॉम्बस्फोट हल्ला झाला होता, जिथे हजारो नागरिकांनी आश्रय घेतला होता.