मुक्तपीठ टीम
शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युती तुटल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपाविरोधात आक्रमक असतात. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे सर्व नेते सरसावतात. त्यात मोहित कंबोज यांच्यासारखे काही वादग्रस्तही असतात. आता शिवसेनाविरोधात आक्रमकतेने पुढे सरसावणाऱ्या वादग्रस्त नावांमध्ये माजी काँग्रेस आणि आजी भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांची भर पडली आहे. त्यांनी संजय राऊतांना मारलेला टोला चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, “संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा! त्यांना संजय राऊत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत माझे चांगले मित्र, पण…
- संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत.
- आमची मैत्री आहे.
- पण आज होळीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ते वारंवार म्हणत असतात शिवसेनेचे लोक अयोध्येला कारसेवेसाठी गेले, मंदिर बनवण्यासाठी गेले, आम्ही हिंदुत्वाचं पालन करू, आम्ही हिंदू आहोत वगैरे.
- ते वारंवार हे बोलत आहेत.
- पण त्यांना दोन पक्षांच्या सरकारसोबत वाटचाल करायीच आहे.
दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम!
- असं म्हणतात वृंदावन मे आना है, तौ राधे राधे कहना है… पण संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा!.
- राऊत आमचे चांगले मित्र असून त्यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा करायची आहे.
कृपाशंकरांना भाजपात वाढतं महत्व, राऊत काय उत्तर देणार?
आता संजय राऊत आपल्या स्वयंघोषित मित्र असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना कसं उत्तर देतात, तेथे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना बेहिशेबी मालमत्ता आणि अन्य गुन्हे दाखल झाले होते. पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मोकळे झाले. त्यांनी पुढे भाजपाचं कमळ हाती घेतलं. उत्तरप्रदेशात भाजपासाठी प्रचारही केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत ते त्यांच्यासोबत दिसल्याने भाजपा त्यांना मुंबई मनपाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतांसाठी महत्व देवू लागल्याचं दिसत आहे.