मुक्तपीठ टीम
रॉयल एनफील्डचे आधुनिक मॉडेल स्क्रॅम ४११, १५ मार्च रोजी भारतात लाँच करण्यात आले आहे. हिमालयीन बाईक आधारित ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत २ लाख रुपयांना लाँच करण्यात आली आहे. रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ हा कंपनीच्या मते एडीव्ही क्रॉसओव्हर आहे, जो अॅडव्हेंचर बाइक्स आणि स्क्रॅम्बलरला एकत्र जोडतो. रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ हे इंजिन आणि प्लॅटफॉर्मच्या बाबतीत हिमालयीन बाईकची बरोबरी करते. या बाईकच्या टॉप स्पेक व्हेरिएंटची किंमत २.०८ लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
मॉर्डन बाईकचे कलर ऑप्शन्स
- रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ अनेक कलर ऑप्शन्ससह ऑफर करण्यात आली आहे.
- या कलर ऑप्शन्समध्ये पांढरा, लाल, राखाडी, पिवळा आणि काळा यांचा समावेश आहे.
रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११चे भन्नाट फिचर्स
- रॉयल एनफील्डचे स्क्रॅम ४११ समोर एक लांब विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टॅंडर्ड लगेज रॅक, मोठ्या पुढच्या चाकाऐवजी लहान चाके, रियर पिलर ग्रॅब हँडलचा वापर करण्यात आला आहे. जे अधिक हायवे क्रूझिंग मशीन बनवण्यासाठी प्रभावी ठरेल.
- हिमालयीन बाईकच्या तुलनेत, स्क्रॅम ४११ ला दुय्यम फेंडर्स, उंच विंडस्क्रीन किंवा रॅपराउंड फ्रेम मिळत नाही आणि स्प्लिट सीट सिंगल-पीस सीटने बदलल्या गेल्या आहेत. मागील लगेज रॅक देखील ग्रॅब रेलने बदलण्यात आला आहे.
- या मोटरसायकलचे व्हील बेस-१४५५ एमएम, ग्राउंड क्लीयरन्स २०० एमएम, लांबी २१६० एमएम, रुंदी ८४० एमएम, उंची ११६५ एमएम, सीटची उंची ७९५ एमएम, मोटारसायकलचे वजन १८५ किलो आहे, इंधन क्षमता १५ लिटर एवढी आहे.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ इंजिन फिचर्स
- रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११च्या इंजिनमध्ये ४११ सीसी, सिंगल सिलेंडर, फोर स्ट्रोक, एअर-कूल्ड, फ्युएल इंजेक्शन या फिचर्सची क्षमता आहे.
- यामध्ये २४.३ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
- हिमालयीन बाईकच्या तुलनेत स्क्रम थोड्या वेगळ्या फॅशनमध्ये दिसत आहे. या मोटरसायकलला ५ गिअर्स आहेत.