मुक्तपीठ टीम
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. मजूर फेडरेशनचा अध्यक्ष किंवा सदस्य असणे गुन्हा असेल तर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. सध्याच्या घडीला राज्यात असणाऱ्या मजूर संघटनांच्या अध्यक्षपदी ९० टक्के राजकीय व्यक्ती आहेत. मग प्रवीण दरेकर यांच्यासारखाच न्याय लावायचा झाल्यास या सर्वांना राजीनामे द्यावे लागतील, असे फडणवीस म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण बंद करणार नाही…
- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, या संदर्भातील फॉलोअप मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशी माहिती आमच्याकडे आहे.
- मी कालच सांगितलं होतं की, नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्तापक्षाच्या वतीने सांगण्यात यंतंय आम्ही सहा-सात जणांची यादी संजय पांडे यांच्याकडे दिली आहे.
- त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकर यांचं आहे.
- ते आम्हाला आज प्रत्यक्षात लक्षात आलं आहे.
- आम्ही याला घाबरत नाही.
- आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले… आम्ही न्यायालयात जावू, आंदोलन करु, जनतेच्या दरबारात जावू पण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण आम्ही बंद करणार नाही.
जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो…
- मला कल्पना आहे की, अनेक खोटे गुन्हे दाखल होतील.
- पण लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे.
- मी या सरकारला इतकंच सांगू इच्छितो की, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे त्यांनी लक्षात ठेवावं.