मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी अलिकडेच दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी केली. आता पुन्हा एकदा नितेश आणि निलेश या राणे बंधुंवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडत त्यांच्या जीवास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडीली आरोप-प्रत्यारोपांमध्ये एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे.
राणे बंधूंवर मुंबईत गुन्हा
- नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.
- मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली होती.
अनेक कलमांअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल देशमुख मराठा, नवाब मलिक मुस्लिम – नितेश राणे
- काही दिवसांपूर्वीच आझाद मैदानावर वादग्रस्त भाष्य नितेश राणे यांनी केले होते.
- अनिल देशमुख मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते आणि नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.
- हे सगळं दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरुन होत आहे.
- आमदार नितेश राणे यांनी समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
निलेश राणे थेट दाऊदचा माणूस म्हणाले…
- माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
- अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत.
- काही वेगळे राजकारण आहे का?
- शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो.
- ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता.
- मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा?
- नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो.
- नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, असंही ते म्हणाले होते.