मुक्तपीठ टीम
आपला देश आणि आपल्या देशावर आधारित देशप्रेम जागवणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपट प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालण्याचा प्रयत्न अनेकदा दिसतो. काश्मीर फाईल्स हा चित्रपट अशाच प्रकारे काश्मीरात ९०च्या दशकात घडलेल्या घटना मांडत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. पल्लवी जोशी, प्रकाश बेलावाडी, अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.
विवेक अग्निहोत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
- ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
- यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी जोशीही होती.
- अभिषेकने त्याच्या ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत. इंटरनेटवर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नरेंद्र मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले
- अभिषेक अग्रवाल यांनी फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटण्याचे सौभाग्य मिळाले.
- काश्मीर फाइल्सवर त्यांनी केलेल्या कौतुकामुळे ही बैठक आणखी खास झाली आहे.
- चित्रपट निर्मितीचा इतका अभिमान आम्हाला कधीच वाटला नाही. धन्यवाद मोदीजी. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० रेटिंग मिळाले आहे.
काश्मीर फाइल्स चित्रपट हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने राज्यातील चित्रपट सहा महिन्यांसाठी करमुक्त केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी आभार व्यक्त करताना लिहिले, माननीय मनोहर लाल खट्टर जी यांचे अनेक आभार. त्याचबरोबर या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.