मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी भाजपाच्या भरघोस यशानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांकडून तपास यंत्रणांवर दबाब टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यांचा हल्ला बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील मविआवर आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींना सुनावले आहे. “केंद्रीय यंत्रणा विरोधकांना ठरवूनच टार्गेट केले जात आहेत, त्यावर बोलणारच, हे मी बोलल्यावर दहा मिनिटात आमच्या घरावर धाडी पडल्या तरी मी घाबरत नाही,” असे ते म्हणाले.
संजय राऊतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर
- केंद्रीय तपास यंत्रणा चुकीने काम करत आहेत.
- एकाच पक्षाचे आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत.
- पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे.
- केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावानेच काम करतात या मतावर महाविकास आघाडी ठाम आहे.
- कोणी काही बोललं तरी आमच्या मतात काही फरक पडणार नाही.
- हे मी बोलल्यावर दहा मिनिटात आमच्या घरावर धाडी पडल्या तरी मी घाबरत नाही.
- टाका रेड. शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमूलवर केवळ राजकीय कारणासाठीच हल्ले करत आहात हे थांबवा.
- तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करतात हे आम्ही सांगतो तो दबाव कसा असू शकतो?
- सत्य सांगणं हा दबाव आहे का?
- मग सत्य ऐकण्याची तयारी ठेवा.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
- आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत.
- तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो.
- ही या लोकांची प्रवृत्ती आहे.
- हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात.
- कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात.
- मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- तर हे पंथ मजबूत होतील, समाज मजबूत होईल.