मुक्तपीठ टीम
फोन टॅपिंग प्रकरणावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात जो फोन टॅपिंगचा पॅटर्न होता तोच पॅटर्न आता गोव्यातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेच गोव्यात निवडणुकीचे प्रभारी होते, असे राऊत म्हणाले आहे. तर राऊतांच्या या आरोपांना फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत.
गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू
- ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे.
- दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते.
- त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती.
- काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली.
- मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत.
- फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे.
- गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे.
- हा महाराष्ट्र पॅटर्न आहे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते.
- आम्ही काळजी घेत आहोत.
- तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत.
फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर
- संजय राऊतांच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणात या सगळ्याने माझं मनोरंजन होतंय.
- या आरोपात काही तथ्य नाही.
- राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत.
भाजपाकडून कोणत्याही नेत्यांचे फोन टॅपिंग केलेले नाही-उपमुख्यमंत्री आजगावकर
- गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.
- आम्ही कोणावर डाव धरायचा, हल्ला करायचा असा विचार सुध्दा करत नाही.
- भाजपाकडून कोणत्याही नेत्यांचे फोन टॅपिंग केले गेले नाही.
- राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात.
- निवडणुका म्हटल्यावर असे आरोप होणारच.
- ज्यांच्यात खोट नाही, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही.
- तसेच गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचंच सरकार येणार आहे. हे संपूर्ण बहुमताचं सरकार असेल.