मुक्तपीठ टीम
शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही युक्रेनची राजधानी किव्हवर रशियन सैन्याचे हल्ले सुरुच आहेत. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केंद्र सरकारला युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणण्यास सांगितले आहे. संघाने जागतिक नेते, मुत्सद्दी आणि समाजातील इतरांना पुतीन यांना संवादाद्वारे समस्येचे निराकरण करण्यासाठी राजी करण्याचे आवाहन केले.
शुक्रवारी, संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी देखील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेनवरील लष्करी आक्रमण त्वरित थांबवण्यासाठी दबाव आणण्यासाठी इतर देशांशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले. संघाच्या एका वरिष्ठ प्रचारकाने एका संदेशात म्हटले आहे की, युद्धाने कोणतीही समस्या सुटत नाही. यामुळे मानवतेचे नुकसान होते. भारताला शांतता हवी आहे. युद्धाला जन्म देणारी कोणतीही परिस्थिती असू नये. युद्धाची भीषणता अत्यंत भयावह, वेदनादायक आणि असह्य असते.
राष्ट्रीय ख्रिश्चन मंच आणि राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संस्थापक इंद्रेश कुमार यांनीही मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांना रशियाने शांतता, सौहार्द आणि बंधुतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. यामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आणि लाखो लोक बेघर झाले. करोडोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर रशिया आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) गट यांच्यातील मतभेद प्रामाणिक आणि गंभीर संवादातून सोडवण्यावर भर दिला होता.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी हिंदू स्वयंसेवक संघ पुढे
- युक्रेनमध्ये स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी संघाशी संलग्न हिंदू स्वयंसेवक संघ (एचएसएस) पुढे आला आहे.
- संकटात सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मेरठ प्रांत आणि त्याच्याशी संलग्न संघटना ही माहिती त्यांच्या संपर्कांसह सामायिक करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त भारतीयांना मदत करता येईल.
- युक्रेनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना मदत करण्यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाने गुगल फॉर्म जारी केला आहे, जेणेकरून त्यांची माहिती संकलित करून संपर्क साधता येईल.