मुक्तपीठ टीम
रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अखेर युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. त्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले आहेत. राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचीही बातमी आहे.
पुतिन यांचे युक्रेन सेनेला शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन!
- युक्रेनच्या सैन्यानं शस्त्र खाली ठेवावे असे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
- इतर कोणी देशाने हस्तक्षेप केल्यास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असेही पुतीन म्हणाले.
- राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
- कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचीही बातमी आहे.
युद्ध पेटले, शेअर बाजार गडगडले, कच्चे तेल भडकले!
- रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे.
- जगभरातील अनेक शेअर बाजारपेठांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावरही दिसून आला.
- ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सच्यावर पोहोचली आहे.
रशियावर निर्बंधांची घोषणा!
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.
- आमच्या देश आणि नागरिकांना धोका निर्माण करू नका.
- त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की अशा हस्तक्षेपामुळे रशियाकडून त्वरित प्रत्युत्तर दिले जाईल आणि इतिहासात कधीही न पाहिलेल्या अशा परिणामांना सामोरे जावे लागेल.
- दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली.
- रशियाच्या घोषणेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युद्धाला रशिया जबाबदार असेल असे म्हटले आहे.
युक्रेनमध्ये हल्ले युद्धजन्य परिस्थिती
पुतीन यांच्या घोषणेनंतर युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. पुतीन यांच्या या आदेशाने युक्रेनने सहमती दर्शवली नाही तर युरोपमध्ये मोठे युद्ध होईल, असे मानले जात आहे.दुसरीकडे, या परिस्थितीचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत विचार केला जात आहे. आता पुतीन यांच्या आदेशानुसार युक्रेन आणि त्यांचे पाश्चात्य मित्र देश काय पावले उचलतात हे पाहावे लागेल.जर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याने हे मान्य केले नाही आणि त्यांनी रिंगणात उडी घेतली, तर युरोपियन भूमीवर एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते, अशी भीती युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन जनतेला दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे.
अमेरिकेलाही थेट इशारा
- पुतीन यांनी अमेरिकेला हस्तक्षेप न करण्याची धमकीही दिली आहे.
- रशियासाठी हा जीवन-मरणाचा काळ असल्याचे पुतीन म्हणाले.
- आम्ही रेड लाईन ओलांडली आहे.
- आता संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांनी या युद्धात हस्तक्षेप केला तर युक्रेनच्या माध्यमातून युरोप युद्धभूमी बनेल.