Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकप्रिय ‘सेक्रेड गेम्स’ची रहस्यमय उत्कंठावर्धक श्रवणगाथा स्टोरीटेलवर!

February 23, 2022
in घडलं-बिघडलं
0
Sacred Games now on Storytel marathi

मुक्तपीठ टीम

श्राव्यसाहित्यात विश्वरूपी मानके निर्माण करणारी जगविख्यात ‘स्टोरीटेल’ नवं क्षितिज पेलण्यात अग्रेसर राहिली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता ‘श्राव्यरूपात’ स्टोरीटेलने आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे. यापूर्वी स्टोरीटेलने ‘वळू’ या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाची रंजकदार पटकथा दस्तुरखुद्द अभिनेते लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात प्रकाशित केली होती. या प्रयोगाला मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने ‘सेक्रेड गेम्स’ची ऑडिओ निर्मिती करण्याचा उत्साह वाढला आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या ऑडिओबुकलाही रसिक पसंती देतील असा विश्वास स्टोरीटेलच्यावतीने प्रसाद मिरासदारांना वाटत आहे.

 

काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ पाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आली, ती कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग १ व २ ची लज्जतदार कहाणी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

 

‘सेक्रेड गेम्स’ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच ‘सेक्रेड गेम्स’ कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसली, तर ‘स्टोरीटेलवर’ ऐकताना त्यातला एकूणएक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता! प्रख्यात भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही क्राईम थ्रिलर कादंबरी ‘स्टोरीटेल’ मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात नक्की ऐका.

 

‘सेक्रेड गेम्स’ उत्कंठाअधिक न ताणता स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सचा ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

 

विलक्षण लोकप्रिय ‘सेक्रेड गेम्स’ ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/authors/555121-Vikram-Chandra


Tags: Sacred GamesSTORYTELसेक्रेड गेम्सस्टोरीटेल
Previous Post

पवारसाहेब मोठे नेते! एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही!! -आशिष शेलार

Next Post

राज्यात १ हजार १५१ नवे रुग्ण, २ हजार ५९४  रुग्ण बरे!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १ हजार १५१ नवे रुग्ण, २ हजार ५९४  रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!