मुक्तपीठ टीम
कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई, नागपूर आणि इतर शहर अंतर्गत वरिष्ठ खाजगी सचिव या पदावर एकूण ३४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही नोकरीची संधी मुंबई, नागपूर आणि इतर शहर शहरात आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत अधिकारी
- पालक संवर्ग/ विभागात नियमितपणे समान पद धारण करणे.
- खाजगी सचिव श्रेणीत ०३ वर्षांच्या सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ५६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आयटीएटीच्या अधिकृत वेबसाइट https://itat.gov.in/itat वरून माहिती मिळवू शकता.