मुक्तपीठ टीम
आयकर विभागाने गुरुवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने धाड घातली आहे. चित्रा रामकृष्ण या अलीकडेच सेबीच्या आदेशाने चर्चेत आल्या आहेत. आदेशात म्हटले आहे की, हिमालयात राहणाऱ्या एका ‘अज्ञात योगी’च्या सांगण्यावरून चित्रा यांनी आनंद सुब्रमण्यम यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते!
चित्रा रामकृष्ण, योगी आणि एनएसई!
- आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामकृष्ण आणि इतरांवर करचोरी आणि आर्थिक हेराफेरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर छापे टाकण्यात आले.
- चित्रा यांना एप्रिल २०१३ मध्ये एनएसईचे एमडी आणि सीईओ बनवण्यात आले होते.
- डिसेंबर २०१६ पर्यंत त्या या पदावर होत्या.
- मिळालेल्या माहितीनुसार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले आहेत.
रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड!
- सेबीच्या आदेशात म्हटले आहे की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या आर्थिक आणि व्यावसायिक योजनांसह काही अंतर्गत गोपनीय माहिती हिमालयातील या योगींशी शेअर केली.
- तसेच एक्सचेंजच्या कर्मचार्यांच्या कामगिरीचे मूल्यांकनाबाबतही त्यांनी या योगींचा सल्ला घेतला असल्याचे सेबीच्या आदेशात सांगणायत आले आहे.
- सेबीने रामकृष्ण आणि इतर काही आरोपींना दंडही ठोठावला आहे.
- सेबीने रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड ठोठावला आहे.
- सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
- आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सल्लागार म्हणून नियुक्ती करताना संरक्षण कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते आहे.
योगींच्या आदेशानुसार आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती!
- नुकताच सेबीने राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
- आनंद सुब्रमण्यम यांची एनएसईवर नियुक्ती एका ‘योगी’च्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे सेबीच्या अहवालात म्हटले आहे.
- तर, सुब्रमण्यम यांना भांडवली बाजाराचा अनुभव नव्हता. एवढेच नाही तर त्यांचे वार्षिक पगार आणि भत्ते १५ लाखांचे पॅकेज ४ कोटींवर नेण्यात आले.
एनएसई हे देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज…
- सेबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईशी संबंधित निर्णय एका योगींच्या सांगण्यावरून घेतले, ज्यांना कधी पाहिलेही नव्हते.
- चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयात राहणाऱ्या एका योगींचा प्रभाव होता.
- एनएसई हे देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.
- यामध्ये दररोज ४९ कोटींचे व्यवहार होतात.
- एनएसई ची एक दिवसाची उलाढाल ६४ हजार कोटी आहे.