मुक्तपीठ टीम
विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौक्सी आणि पंजाब नॅशनल बँकनंतर देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघडकीस झाला आहे. देशातील नामांकित स्टेट बँक ऑफ इंडियासह २८ बँकांची २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एबीजी शिपयार्ड या जहाज बांधणी कंपनीने हा घोटाळा केला आहे. बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे कारण हा नीरव मोदीपेक्षाही मोठा घोटाळा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रथम तक्रार
- स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वप्रथम ८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती.
- यावर सीबीआयने कंपनीकडून १२ मार्च २०२० रोजी उत्तर मागितले होते.
- सुमारे पाच महिन्यांनंतर कंपनीने नवीन तक्रार दाखल केली.
- १८ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती.
कोणत्या बँकेची किती थकबाकी
- स्टेट बँक ऑफ इंडिया -२,४६८.५१ कोटी
- आयसीआयसीआय – ७,०८९ कोटी
- आयडीबीआय – ३,६३४ कोटी
- बँक ऑफ बडोदा – १,६१४ कोटी
- पीएनबी – १२४४ कोटी
- आयओबी- १,२२८ कोटी
या लोकांवर गुन्हा दाखल
- बीआयने एफआयआरमध्ये तत्कालीन कार्यकारी संचालक शंथनम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवतिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे नावेही नोंदवली आहेत.
- त्यांच्यावर फौजदारी कट रचणे, फसवणूक, विश्वास भंग आणि पदाचा गैरवापर अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एबीजी शिपयार्ड ही एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग…
- एबीजी शिपयार्ड ही २० टन वजनाची जहाजे बांधण्याची क्षमता असलेली भारतातील सर्वात मोठी खाजगी जहाज बांधणी कंपनी आहे.
- एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे.
- १९८५ मध्ये स्थापन झालेल्या, याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
- गुजरातमधील सुरत आणि दहेजमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू आहे.
- ऑक्टोबर २०१० मध्ये वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडच्या अधिग्रहणानंतर, ते गोव्यात जहाज दुरुस्ती युनिट चालवते जी भारतातील सर्वात मोठी जहाज देखभाल सुविधा आहे.
- आतापर्यंत या कंपनीने १६५ जहाजे बांधली आहेत.