मुक्तपीठ टीम
अशोक लेलँडतर्फे आयसीव्ही ई-कॉमेट स्टार सीएनजी ट्रक वाहनांची मालिका बाजारात आणणण्यात आली आहे. हे नवीन ट्रक या प्रकारच्या श्रेणीतील तसेच केएमकेजी, पॉवर आणि सिंगल फील श्रेणीमधीलही सर्वोत्तम आहेत. ग्राहकांना निवड करण्यासाठी १६.१ टन आणि १४.२५० टन जीव्हीडब्ल्यू असे दोन पर्याय उपलब्ध असून आणि सीएनजी सिलिंडरसाठी ३६० लिटर/४८० लिटर/५७० लिटर असे तीन पर्याय मिळणार आहेत.
नवीन ट्रकच्या सादरीकरणाबाबत बोलताना अशोक लेलँडचे एमएचसीव्ही प्रमुख संजीव कुमार म्हणाले, “आयसीव्ही सीएनजी श्रेणीला जोरदार मागणी मिळत असल्याने आम्ही अत्यंत यशस्वी ई-कॉमेट व्यासपीठावर आधारलेल्या ई-कॉमेट स्टारची ही पहिली मालिका सादर केली आहे.
स्वच्छ परिवहन आणि दळणवळणाच्या दिशेने जसजसे आपण प्रगती करत आहोत, तसतशा ग्राहकांच्या गरजा देखील वाढताना दिसून येत आहेत; आणि म्हणूनच अधिक सुरक्षित असलेली, इंधन कार्यक्षम असणारी आणि श्रेणीतील सर्वोत्तम एकूण मालकी खर्च (टीसीओ) येणारी आमची सीएनजी मालिका या सर्व गरजांची पूर्तता करणारी आहे. ही नवी मालिका आमच्या पोर्टफ़ोलिओला आणखी भक्कम, सक्षम बनविणारी असून गुजरात राज्याच्या बाजारपेठेतील आमचा हिस्सा सुधारण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे; तसेच जागतिक स्तरावरील पहिल्या १० व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी बनण्याचे ध्येय साध्य करण्यात उपयुक्त ठरणार आहे.”
आपकी जीत, हमारी जीत या कंपनीच्या तत्वज्ञानाशी सुसंगत राहत, चालकाच्या सुरक्षिततेला आणखी विस्तारित करणारी बाह्य आणि अंतर्गत रचना या नवीन मालिकेत करण्यात आलेली आहे. नवीन युगाच्या चालकाच्या अपेक्षा ध्यानात ठेवून त्यानुसार अत्याधुनिक डिजिटल चालक सहायक डॅशबोर्ड, रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षा बहाल करणारे शक्तिशाली गोलाकार हेडलँप यांनी ही मालिका सुसज्ज करण्यात आलेली आहे. उच्च इंधनक्षमता, अधिक चांगले टायर लाईफ, देखभाल कामासाठी लागणारे दीर्घ अंतर आणि एकूणच कमीतकमी देखभाल खर्च या सर्वांना एकत्रित करून ही मालिका वाहनांच्या ताफ्याचे मालक असणाऱ्यांसाठी विस्तारित टर्न अराउंड टाईम (टीओटी) चा लाभ मिळवून देणारी आणि त्यायोगे मालकीसाठी येणाऱ्या एकंदर खर्चाबाबत (टीसीओ) श्रेणीतील सर्वोत्तम ठरेल अशा प्रकारे बनलेली आहे.