मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठीची मोहीम संपलेली आहे. या टप्प्यात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी ११४ जणांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे, तर १२ निरक्षर आहेत. उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच आणि एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, १०२ उमेदवार मास्टर्स आणि सहा पीएचडीधारक आहेत.
दुसऱ्या टप्प्यात अमरोहा, बरेली, बिजनौर, बदाऊन, मुरादाबाद, रामपूर, सहारनपूर, संभल आणि शाहजहांपूर येथे निवडणुका होणार आहेत. या टप्प्यात ५८६ उमेदवार सहभागी आहेत. अहवालात ५८४ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा आढावा घेण्यात आला आहे. दोन उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास होऊ शकला नाही. अहवालानुसार १२ उमेदवार निरक्षर, ६७ साक्षर, १२ पाचवी, ३५ आठवी, ५८ दहावी आणि ८८ बारावी उत्तीर्ण आहेत. १०८ उमेदवार पदवीधर, ८९ पदवीधर व्यावसायिक, १०२ पदव्युत्तर, ६ पीएचडी, ५ पदविकाधारक आहेत. दोन उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता नमूद केलेली नाही.
पंचवीशी ते नव्वदीपर्यंतच्या वयोगटातील उमेदवारांचा समावेश
- या टप्प्यात उभे असलेल्या उमेदवारांच्या वयाबद्दल बोलयचे झाल्यास, ५६ उमेदवार २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहेत.
- १५० उमेदवार ३१ ते ४०, १७९ उमेदवार ४१ ते ५०, १३० उमेदवार ५१ ते ६० आणि ६२ उमेदवार ६१ ते ७० वर्षांच्या दरम्यान आहेत.
- त्याच वेळी, सहा उमेदवारांचे वय ७१ ते ८० वर्षे आणि एका उमेदवाराचे वय ८१ ते ९० वर्षे दरम्यान आहे.
८८ टक्के पुरुष आणि १२ टक्के महिलांचा समावेश
या टप्प्यात ८८.२% म्हणजेच ५१५ उमेदवार पुरुष आणि ११.८ टक्के म्हणजेच ६९ उमेदवार महिला आहेत.