मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केलाय त्याविषयी महाराष्ट्र सरकारनं बोलावं, प्रत्येक वेळी बोलायला ठेका घेतला आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे.
महामारीचं खापर महाराष्ट्रावर फोडण्यात आलंय…
- मोदींनी महाराष्ट्राविषयी जो उल्लेख केलाय त्याविषयी महाराष्ट्र सरकारनं बोलावं
- उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून वाईट वाटलं.
- कोरोना या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय.
- त्या महामारीचं खापर महाराष्ट्रावर फोडण्यात आलंय.
- जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय.
- महाराष्ट्र सरकार कसं काम करतंय याचे दाखले सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं इतरांना दिले होते.
- डॉक्टर, नर्सेस यांनी काम केलं होतं.
- हौतात्म्य पत्करलं त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे.
- महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी देखील बोलायला हवं.
संजय राऊतांचा खोचक सवाल
- महाराष्ट्राच्या सरकारनं बोलावं
- सोनू सूदला राज्यपालांकडं कोण घेऊन जातं होतं, असा सवाल केला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी बोलावं.
- राज्य सरकारमध्ये बसलेल्यांनी बोलावं, प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का?, असा सवाल देखील त्यांनी
- केला.