Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच लाख घरे बांधणार! १५ फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के घरकुलांना मंजुरी!

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

February 6, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Maha Awas Abhiyan

मुक्तपीठ टीम

ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी सातत्याने शासनाकडे मागणी होती. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधून त्याची उद्दिष्टपूर्ती पूर्ण केली असून आता महाआवास अभियान २.० मधील आणखी ५ लाख घरे ३१ मार्च २०२२ पर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय करूया, अशा सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना केल्या आहेत.
महाआवास अभियान २.० ची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सहसचिव मंगेश मोहिते, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ.राजाराम दिघे, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपसंचालक निलेश काळे, राज्य ग्रामीण योजनेचे उपसंचालक श्रीमती मंजिरी टकले तसेच राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपआयुक्त, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

ग्रामविकास मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संकट काळातही महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यास सुरूवात केली. या मोहिमेमुळे वेळेत घरे तयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 5 लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

 

महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गुणात्मक व संख्यात्मक बदल करण्यात आला असून त्यात लॅंड बॅंक, सॅंड बॅंक, बहुमजली गृहसंकुले या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केल्या. मंजुरीनंतर पहिला हप्ता वितरीत करण्याचा कालावधी ३७ दिवसावरून ७ दिवसांवर आणावा. मंजुरीनंतर घरकुले वेळेत पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित मंजुरी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, भूमिहीन लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही श्री.मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.

 

घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने ‘ड’ प्लस यादीला मान्यता दिली असल्याने १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यास शंभर टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात यावी. नाविन्यपूर्ण घरे बांधण्याची जी काम अपूर्ण आहेत, ती कामे जलदगतीने पूर्ण करावीत आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी दिले.


Tags: good newsMaha Awas AbhiyanMaha Awas Abhiyan - Gramin 2021-22muktpeethRural Development Minister Hasan Mushrifsecond phaseग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफघरकुल मंजुरीचांगली बातमीमहाआवास अभियानमहाआवास अभियान दुसरा टप्पामुक्तपीठ
Previous Post

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी शिक्षण खात्याची प्रश्नपेढी

Next Post

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना! ४५३ टन केळ्यांची वाहतूक!

Next Post
Kisan Railway

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना! ४५३ टन केळ्यांची वाहतूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!