मुक्तपीठ टीम
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर), जनरल ड्यूटी महिला एसएसए, कमर्शियल पायलट लायसन्स एसएसए, मेकॅनिकल टेक्निकल, टेक्निकल (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री या पदांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर)- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- जनरल ड्यूटी (महिला एसएसए)- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- कमर्शियल पायलट लायसन्स- १) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण २) सीपीएल (कमर्शियल पायलट लायसन्स)
- टेक्निकल (मेकॅनिकल)- १) ६०% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल अॅंड प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस) २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- टेक्निकल (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स)- १) ६०% गुणांसह इंजिनीएरिंग पदवी (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) २) ५५% गुणांसह १२वी (गणित अॅंड भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- लॉ एन्ट्री- ६०% गुणांसह विधी पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.