मुक्तपीठ टीम
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने काही वर्षांपूर्वी २८० शब्दांमध्ये पोस्ट करण्याची सुविधा दिली होती, परंतु, यूजर्सना या साइटवर व्यक्त होण्यासाठी ही सुविधा पुरेशी वाटत नाही. यामुळेच ट्विटर एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. ज्यामुळे २८० शब्दांमध्येच ट्वीट करण्याचे बंधन समाप्त होईल. नव्या अपडेटनंतर ही मर्यादा हटवली जाईल. नेहमीच्या ट्वीटसोबतच मोठे लेखही आर्टिकल फिचरखाली ट्वीट करता येतील.
ट्विटरचे नामांकित टिपस्टर जेन मंचून वोंग यांनी ट्विट केले आहे आणि दावा केला आहे की, ट्विटर एका नवीन फिचरवर काम करत आहे जे “ट्विटर आर्टिकल” म्हणून सादर केले जाईल. त्यांनी या फिचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
ट्विटरचे हे फिचर एका वेगळ्या बटणात मिळेल. जर तुम्हाला २८० पेक्षा जास्त शब्द पोस्ट करायचे असतील तर, तुम्हाला या बटणावर क्लिक करावे लागेल. सध्या जरी लांब पोस्ट लिहिण्यासाठी थ्रेडचा पर्याय उपलब्ध असला तरी आता, २८० शब्दांपेक्षा जास्त शब्दांमध्ये ट्वीट करण्याचा पर्याय मिळेल.
ट्विटर आणखी एका नवीन फिचरवर काम करत आहे
- ट्विटरची सध्या एका नवीन फिचरची चाचणी सुरू आहे.
- नवीन अपडेटनंतर, इंस्टाग्रामप्रमाणे, ट्विटर यूजर्स देखील त्यांचे ट्वीट काही जवळच्या लोकांसह शेअर करू शकतील. ट्विटरचे नवीन फीचर इंस्टाग्रामच्या क्लोज फ्रेंडसारखे आहे.
- नवीन अपडेटनंतर, ट्विटर यूजर्स त्यांच्या १५० फॉलोअर्सह कोणताही कंटेंट शेअर करण्यास सक्षम असेल.
- ट्विटरच्या या फिचरची पहिली झलक गेल्या वर्षी जुलैमध्ये पाहायला मिळाली होती. त्या काळात या फिचरला ट्रस्टेड फ्रेंड्स या नावाने पाहिले गेले.