मुक्तपीठ टीम
अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२२-२०२३चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत, पण आपण कोरोनाची लढाई चांगल्या प्रकारे लढत आहोत. या लढ्यात कोरोना लसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आम्ही अमृत काल साजरा करत आहोत, असे सुरुवातीलाच सांगून अर्थसंकल्पाची सर्वव्यापी दिशा स्पष्ट केली.
या अर्थसंकल्पात ३० लाख नोकऱ्या देण्याची क्षमता असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान हमी भावासाठी २ लाख ३० हजार कोटींची तरतुद असल्याचं सांगितलं. शेतीसाठी ड्रोनचा वापर वाढवण्यावरही भर देण्याचं धोरण त्यांनी मांडलं. पायाभूत सुविधांसाठी २० हजार कोटींचा निधी असल्याचं त्यांनी सांगितले. विद्याऱ्थ्यांच्या शिक्षणासाठी पीए ई विद्याच्या माध्यमातून २०० खास टीव्ही चॅनल्स सुरु करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थमंत्री आज डिजिटल बजेट सादर करणार आहेत, असा खास उल्लेख केला. याहीवेळी अर्थमंत्र्यांनी टॅबवर वाचत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
सर्वांगीण कल्याण हे आमचे ध्येय आहे!
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सर्वांगीण कल्याण हेच आमचे ध्येय आहे.
- गरिबांची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अर्थमंत्री म्हणाले की, आमचे सरकार २०१४ पासून गरीब आणि उपेक्षित लोकांचे सक्षमीकरण करण्यात गुंतले आहे.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आगामी आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ९.२% राहण्याचा अंदाज आहे.
पीएम पॉवरची ७ इंजिने काम करणार!
- कोरोना महामारीचा संदर्भ देत निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आम्हाला आशा आहे की, आपला भारत आपला विकास प्रवास सुरू ठेवेल.
- त्यांनी पीएम गति शक्तीचा उल्लेख केला.
- पीएम गतिशक्तीद्वारे देश सशक्त होईल.
- पीएम पॉवरची ७ इंजिने काम करतील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
पुढील २५ वर्षांची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प!
- अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, या अर्थसंकल्पामुळे भारताला पुढील २५ वर्षे पायाभरणी करता येईल.
- चालू वर्षात भारताची आर्थिक वाढ ९.२% राहण्याचा अंदाज आहे, जी प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.
- अर्थमंत्री सीतारामन यांनी सभागृहात सांगितले की एअर इंडियाचे निर्गुंतवणूक पूर्ण झाली आहे.
- एलआयसीचा आयपीओ लवकरच येईल.
तरुणांना रोजगार, ४००नवीन वंदे भारत ट्रेन
- अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, शेतकरी, तरुणांना अर्थसंकल्पाचा फायदा होईल.
- आत्मनिर्भर भारतातून १६ लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम केले जाईल.
- येत्या तीन वर्षांत ४००नवीन वंदे भारत गाड्या तयार करण्याचे काम सरकार करणार आहे.