Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात याव्यात” – प्रा मुकुंद आंधळकर

February 1, 2022
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Students Agitation for offline exam

प्रा मुकुंद आंधळकर

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात असा निर्णय माननीय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांना कळवला होता व त्यामध्ये कोणताही बदल सुचवलेला नाही. बारावीच्या ऑनलाइन परीक्षा घेणे ग्रामीण भागात अशक्य असून त्या सुरळीतपणे पार पडणार नाहीत. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे असे महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी कळवले आहे. महाराष्ट्रात काहीजण ऑनलाइन परीक्षा घेण्यास सुचवत असले तरी ते तांत्रिक सुविधेअभावी शक्य होणार नाही. या वर्षी मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेणे आवश्यक असून ऑफलाइन परीक्षेला इतर कोणत्याही पर्याय आता उपलब्ध नसल्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तीव्रतेमुळे गेल्या वर्षी २०२१ मध्ये इयत्ता बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेता येणे शक्य झाले नव्हते तथापि या विद्यार्थ्यांनी मंडळाची शालांत परीक्षा दिलेली असल्यामुळे या गुणांच्या आधारे काहीसा न्याय बारावीच्या परीक्षांबाबत गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना देता आला होता परंतु आता यावर्षी हे शक्य होणार नाही तसेच आता कोरोनाचा प्रभाव पुरेसा कमी झाला असून जनजीवन जवळपास सुरळीत झाले आहे अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर ठेवणे उचित ठरणारे नाही. तांत्रिक सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात जुलैपासूनच ऑफलाइन वर्ग सुरू झाले असल्यामुळे तसेच तांत्रिक सुविधा असलेल्या शहरी भागात आधी ऑनलाईन व नंतर ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पुरेसा झाला आहे तसेच प्रात्यक्षिकेही पुरेशा प्रमाणात झालेली आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आलेला असून परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रश्नपत्रिका तयार आहेत, वेळापत्रक जाहीर झाले आहे, परीक्षा केंद्र निश्चितीकरण अंतिम टप्प्यात आहे. प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षांची तयारी झाली आहे. अशावेळी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी मानसिक दृष्ट्या व अभ्यासाच्या दृष्टीने तयार आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काहीशा संभ्रमावस्थेत का होईना पण परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. दहावी-बारावीच्या मंडळाच्या परीक्षा ऑफलाइन होणे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सुध्दा हितकारक आहे.

प्रा मुकुंद आंधळकर
(समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ)


Tags: hsc examMaharashtra State Junior College Teachers FederationOffline ExamsProf. Mukund Andhalkarप्रा मुकुंद आंधळकरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ
Previous Post

बंगालच्या राज्यपालांबद्दल वाचून मविआ नेते म्हणतील आपले राज्यपाल कोश्यारीच चांगले!

Next Post

देशाचा अर्थसंकल्प: “हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांसाठी पायाभरणी करणारा! सर्वांगीण कल्याणाचा उद्देश” -अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Next Post
nirmala sitharaman

देशाचा अर्थसंकल्प: "हा अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांसाठी पायाभरणी करणारा! सर्वांगीण कल्याणाचा उद्देश" -अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!