मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील शिवसेना उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्व बाद केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माजी आमदार गुड्डू पंडित यांच्यासह किमान सहा-सात शिवसेना उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी त्यांची सुनावणीही घेत नाहीत. शिवसेनेला घाबरून आणलेल्या दबावामुळे तसे घडत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
शिवसेना उमेदवारांना धमक्या!
- माझ्याकडे पुरावे आहे. दुपारी तीन वाजण्यापूर्वी शिवसेना उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले.
- उत्तरप्रदेशात आमच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. निवडणूक अधिकारी, तेथील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. शिवसेनेची भीती वाटत असल्याचे दिसते.
- आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या गेल्या.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावले आहे.
गोव्यात मात्र मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेप मानले नाहीत!
- पश्चिम उत्तरप्रदेशातील आमच्या सहा-सात उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.
- माजी आमदार गुड्डू पंडित शिवसेनेचे उमेदवार होते.
- त्यांचाही अर्ज फेटाळण्यात आला. तसेच आक्षेप गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अर्जालाही घेण्यात आले. पण तेथे ते आक्षेप योग्य असूनही स्वीकारले नाहीत.
- अर्ज स्वीकारण्यात आला.