मुक्तपीठ टीम
अहमदनगरमधील कॅन्टोनमेंट बोर्डात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, नर्स, सहाय्यक शिक्षक, इलेक्ट्रिक लाइनमन पदांच्या एकूण अशी पदे रिक्त आहेत. या ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
- वैद्यकीय अधिकारीसाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ लिपिकसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर तसेच त्याला इंग्रजी टायपिंग व मराठी टायपिंग येणे आवश्यक व त्याने एमस-सीआयटी केलेले असावेत.
- नर्ससाठी अर्ज करणारे हे जीएनएम किंवा बी.एससी नर्सिंग केलेले असावेत.
- सहाय्यक शिक्षकसाठी अर्ज करणारे उमेदवार हे ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण तसेच बी.ईडी/डीईडी केलेले असावेत.
- सीटीईटी आणि एमएससीआयटी केलेले असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक लाइनमनसाठी अर्ज करणारे उमेदवार हे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- २६ फेब्रुवारी २०२१ पद क्रमांक ०१ साठी उमेदवारांचे कमाल वय हे १८ ते ३२ वर्षापर्यंत
- पद क्रमांक ०२ ते ०५ साठी उमेदवाराचे कमाल वय हे १८ ते २५ वर्षापर्यंत असावे.
- एससी,एसटी प्रवर्गासाठी ०५ वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गासाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
शुल्क
- जनरल आणि ओबीसींसाठी ५०० रुपये
- एससी महिलांसाठी २५० रुपये
अधिक माहितीसाठी कॅन्टोनमेंट बोर्डच्या www.ahmednagar.cantt.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता.